Alka Oak's E-book shoppy🚩
Search

Cart

More Details

श्री. ओंकार पाटील यांनी अं. नि. वार्तापत्राच्या ४/९६ च्या अंकात व नंतर किस्त्रीम ९६ च्या दिवाळी अंकात नाडीकेंद्राला भेट देऊन काढलेल्या निष्कर्षाचा सविस्तर लेख छापला होता. विस्तार भयास्तव तो येथे दिलेला नाही तथापि त्याला माझे उत्तर सोबत देत आहे. पुढे मागे हा लेख किस्त्रीम मध्ये छापण्याचे आश्वासन संपादक श्री. ह. मो. मराठे यांनी दिले आहे. ते पाळले जाते किंवा नाही हे नंतर वाचकांना कळेलच ! (पहा पत्र क्र. ४/३८)

साप्ताहिक सकाळने 'नाडी भविष्य फसवणूकीचा आणखी एक धंदा' असा भडक मथळ्याचा लेख दि. जुलै ९६ च्या अंकात छापला होता. त्यात श्री. मेघराज पाटील यांनी ग्रंथपाल श्री. मंजूळ आणि श्री. कटककर, श्री. जकातदार, श्री. भट आदी तज्ञ ज्योतिष्यांच्या मुलाखती घेऊन त्या आधारे लेख रचला होता. त्यांनी स्वतः नाडी भविष्याचा अनुभव घेतला नव्हता. ना माझी भेट घेण्याची त्यांना गरज वाटली. तो लेख व त्याला माझे उत्तर (पहा परिशिष्ट क्रमांक ३६, ३७)