अं.नि.स. चे कार्यवाह डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी जणू ३० सप्टेंबर ९५ ची सभा झालीच नव्हती. अशा आवेशाने कोणाही तमिळाला नाडी पट्ट्या वाचता आल्या नाहीत असा धडधडीत खोटा आरोप केला. बहुधा त्यांना खात्री असावी की एक तर कोणीही तमिळ या आवाहनाकडे लक्ष देऊन सभेस हजर होणार नाही. कोणी चुकून आलेच तर उपस्थित अं.नि.स. च्या धडाकेबाज सभासदांच्या समोर ते नाडीपट्ट्यांतील लिपी तमिळ असल्याचे विधान करण्याचे साहस करणार नाहीत; आणि केले तरी समितीच्या तोंडाळ साक्षीदारांच्या समर्थनामुळे दडपून 'नाही' म्हणता येईल ! तेव्हा त्या सभेमधे काय खरा प्रकार झाला याची शहानिशा करण्याची गरज डॉ. दाभोळकरांना वाटली नाही. मात्र त्यामुळे ते सरळ सरळ तोंडघशी पडले !