अं.नि.स. चे सर्व महत्त्वाचे सभासद आणि खुद्द कार्याध्यक्ष ८५
या सभेला हजर राहतील अशी अपेक्षा होती. त्याचप्रमाणे पुण्यात राहणारे तमिळ जाणकार लोक जास्तीत जास्त संख्यने हजर राहतील असा अंदाज होता. या सभेचे महत्त्व लक्षांत घेऊन 'पुणे वार्ताचे' वार्ताहर श्री. मकरंद गाडगीळ आपल्या व्ही.डी.ओ. कॅमेऱ्यासह आणि आणखी ३/४ वृत्तपत्रांचे वार्ताहर जातीने हजर होते. शिवाय नाडी भविष्य पाहून आलेले किंवा त्याबद्दल अधिक माहिती जाणू इच्छिणारे असे ८० च्या वर लोक उपस्थित होते. कार्यक्रमाला बरोबर ७ वाजता सुरूवात झाली. डॉ. नरेंद्र दाभोळकर स्वतः गैरहजर होते. मात्र नाडी पट्ट्यांचे एनलार्ड्ज फोटो कुठेच लावलेले नव्हते. थोडीशी सुरूवातीची जुजबी माहिती अं.नि.स. चे कार्यकर्ते डॉ. विद्याधर बोरकर यांनी दिली. त्याच वेळी एक व्यक्ती " मी विंग कमांडर ओक, नाडी भविष्य पुस्तकाचा लेखक. मला या सभेत बोलण्याची परवानगी द्यावी". म्हणून पुढे आले व परवानगी मिळताच पुढील २ तास 'नाडी भविष्य' या विषयावर व अं. नि. स. च्या चाहत्यांनी दिलेल्या जाहीर आव्हानावर बोलून, बऱ्याच गोष्टींचा खुलासा आणि नाडी भविष्य पहायला नाडी केंद्रांत जाण्याचे आवाहन केले. त्यांच्या भाषणातील मुद्दे खालील प्रकारे होते.