आपण लिहिल्याप्रमाणे संबंधित व्यक्तीची माहिती खूप प्राचीन काळी लिहून ठेवणे हा चमत्कार मानावा लागेल. यासाठी संबंधित माहितीच्या ज्या पट्ट्या (त्याचे फोटो) आपण पाठवाल त्याआधारे दोन गोष्टींची शहानिशा करावी लागेल.
१) संबंधित पट्टीवर ज्या व्यक्तीची सर्व माहिती आहे (जी तुम्हाला आम्ही आधीच कळवणार आहोत.) यासाठी तमिळी वाचणारे लोक लागतील. ते पुणे-मुंबई येथे सहज उपलब्ध आहेत.
२) माहिती अचूक निघाल्यावर तमिळनाडूला येऊन पट्टचांचा अस्सलपणा तपासणे. वरील चाचणी पूर्णपणे शास्त्रीय असल्याने त्यावरून निष्कर्ष काढणे शक्य आहे. त्यासाठी नारळीकर अथवा पूर्वी प्रचिती मिळालेल्या अन्य व्यक्ती यांच्यावर अवलंबून रहाण्याची कांहीच गरज नाही. पट्टी वाचणारी व्यक्ती तमिळी भाषेची (लिखित लिपीची) चांगली जाणकार आहे याची खात्री आपणही करून घेऊ शकाल. ही चाचणी यशस्वी ठरल्यास त्या पट्टीवरून व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाच्या कांही अन्य बाबीही समजू शकतील. त्याची सत्यता तपासता येईल पण वरील चाचण्या नाडीग्रंथाचे अलौकिक्रत्व सिद्ध करण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या ठरतील. तरी सहकार्य करावे. १५ ते २४ मे व १ ते १० जून मी साताऱ्यात नाही. २५ ते ३० मे भेटू शकेन.