Alka Oak's E-book shoppy🚩
Search

Cart

More Details

कोल्हापूरचे श्री. शं. तेरवाडकर म्हणतात '... चक्रावून टाकणाऱ्या भविष्याचा लेख वाचला स्तंभित झालो. सध्याच्या विज्ञानयुगात तर्कशुद्ध मनाला, हे चमत्कारिक भविष्यकथन पटत नाही? 'आपल्या प्रतिक्रियेत त्यांनी यामागे काहीतरी गौडबंगाल अज्ञात रहस्य किंवा बनवाबनवी असण्याची शक्यता व्यक्त केली आहे आणि याबाबत अधिक संशोधन व्हायला हवे असे मत व्यक्त केले आहे.

इचलकरंजीची नीता शिंदे हा लेख वाचून चक्रावून गेलेली असल्याचे म्हणते. नीताचे म्हणणे असे की, अगस्त्य नाडीच्या पद्धतीने देशाचे आयुष्य तपासता आले तर ते अतिशय फायदेशीर ठरेल. देशावर अचानक येणारी आपत्ती टाळता येईल. शेवटी नीता आपल्या प्रतिक्रियेत म्हणते 'ज्यांना आयुष्याचा कंटाळा आला आहे, ज्या व्यक्तींना जीवनात फक्त नैराश्य स्वीकारावे लागते अशा व्यक्तींना या अगस्त्य नाडीचा खूपच फायदा होईल.