प्रश्न : परंतु कार्यकारणभाव स्थायिक नाही, वैश्विक आहे या शोधाचा कर्मसिद्धांताशी, कर्माची गती गहन आहे या गोष्टीशी नेमका कुठे संबंध येतो ?
उत्तर : कार्यकारणसंबंध स्थानिक नाही, वैश्विक आहे याचा अर्थ “येथे' जी घटना घडताना दिसते ती ‘तेथे घडलेल्या घटनेचा परिणाम असते. ‘तेथे' म्हणजे कोठे ? अर्थात् विश्वात. म्हणजे सर्व ठिकाणी. (विश्व म्हणजे सर्व) याचाच अर्थ कार्यकारणसंबंध वैश्विक आहे, स्थानिक नाही, असा होतो. म्हणजेच विश्व अविभाज्य वा एकात्म असून विश्वातील कोणतीही घटना, कोणतेही कर्म समजण्यासाठी संपूर्ण विश्व समजून घ्यावे लागेल, आणि हे तर्कबुद्धीला अशक्य आहे. या अर्थाने कर्माची गती गहन आहे. अशारीतीने कर्माचा विश्वाशी संबंध येतो. ।
प्राचार्य गळतगे सरांची ग्रंथ संपदा