डॉ.. मिराशी व ओक यांचा वाद १९६७ मध्ये सुरू झाला. नागपूरच्या ‘तरुण-भारतातून या विषयावर दोघांचीही उत्तरे-प्रत्युत्तरे झाली. ओकांचे या विषयावर नागपुरात व्याख्यानही झाले. तसेच मिराशींनी या विषयावर ‘नागपूर-टाइम्स’मधून इंग्रजीत लिखाण केले...
v शिलालेख ‘परमर्दीदेवाच्या काळातील बघारी शिलालेख’ असा आता ओळखला जात असून तो बटेश्वरचा नसून बघारीचा आहे हे आता सर्वमान्य झाले आहे. बघारी हे गाव हमीदपूर जिल्ह्यातील चंदेलांची राजधानी महोबा (महोत्सवपूर) हिच्याजवळ आहे.
v प्रस्तुत शिलालेख बघारी येथे सापडणे अगदी शक्य आहे. कारण परमर्दी राजा हा चंदेल वंशातीलच होता. तेथे चंदेलांचे मंत्री सल्लक्षण व पुरुषोत्तम यांनी भगवान विष्णू व शिव यांची मंदिरे उभारली असणे सुतराम शक्य आहे.
वादात सापडलेला लेख कुठल्या मंदिराला उद्देशून असावा हे नक्की सांगणे अवघड आहे. शेवटी ओकांच्या युक्तिवाद मान्य व्हावा अशी परिस्थिती आहे. अर्थात ठरवावे वाचकांनीच.