Alka Oak's E-book shoppy🚩
Search

Cart

More Details

एका जन्मातील जखमांच्या खुणा दुसऱ्या जन्मातील शरीरावर कुठे निर्माण करावयाच्या, केव्हा व कशा स्वरूपात निर्माण करावयाच्या किंवा त्या निर्माण करावयाच्या की नाही ह्या सर्व गोष्टी...

ब्रह्मपासून निर्माण झालेल्या माणसाच्या कर्माचाही समावेश होतो. त्या कर्माचे फळ त्याला कुठे द्यावयाचे, केंव्हा द्यावयाचे, कशा स्वरूपात द्यावयाचे किंवा द्यावयाचे की नाही, ह्या सर्व गोष्टी ईश्वराधीन, ब्रह्माधीन शरण आहेत, त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या दोन जन्माखेरीज अधिक जन्मांची प्रकरणे न तपासलेल्या स्टिन्टेन्सनना कोणत्याही व्यक्तीच्या कुकर्माच्या शिक्षेच्या (retributive) स्वरूपातील परिणाम त्या व्यक्तीच्या सलगच्या दोन जन्मात आढळून न यावा यात आश्चर्य नाही.


कारण कर्माचा परिणाम सलगच्या जन्मात व्हावा असा नाही नियम नाही. या विश्वरूपी नाटकातील सर्व चांगल्या व वाईट कर्माचा कर्ता आहे. ('चांगले' व 'वाईट' या दोन्हींची मानवाच्या उत्क्रांतीसाठी गरज आहे, हे येथे लक्षात ठेवावे. या दोन्ही झगड्याशिवाय मानवाची आध्यात्मिक उत्क्रांती शक्य नाही.) म्हणून या नाटकातील सुष्ट व दुष्ट ही दोन्ही पात्रे ईश्वरच वठवीत आहे, अशा रीतीने या भौतिक जगात जे काही चालले आहे ते सर्व काही तोच आहे.