Alka Oak's E-book shoppy🚩
Search

Cart

More Details

मृत आई भेटून गेली 

मनुष्य मेल्यानंतर संपत नाही; आत्म्याच्या स्वरूपात अस्तित्वात असतो

बहेणाबाईच्या गाईला मंबाजीने सोट्याने मारले, त्याचे वळ बहेणाबाईचे गुरु तुकाराम यांच्या पाठीवर उठले!


विशाळगडला जाण्याचा आग्रह धरला. तेथील दर्ग्यात दोषी लोकांना बेड्या घालून दर्जातील पिराभोवती पाच फेऱ्या काढावयास सांगतात. 



निष्पाप लोकांच्या समुदायावर बेछूट गोळीबार करून किंवा बॉम्ब टाकून त्यांची हत्या करणारे धर्मांध किंवा लाखो लोकांची सामूहिक हत्या करणारे हिटलर, स्टालीन, माओ, पोल पॉट सारखे राजकीय सत्तांध, अशा लोकांची कर्मे भयंकर तीव्र व वाईट स्वरूपाची असूनही त्यांना तात्काळ किंवा त्यात जन्मात फळे भोगावे लागल्याचे दिसून येत नाही. त्यांच्या वाईट स्वरूपाच्या कर्मांच्या तुलनेत मुलांना लाथेने मारणे ते मामुली कर्म वाटेल! कदाचित अशा लोकांची करणे भयंकर वाईट स्वरूपाची असल्यामुळे त्यांना तात्काळ भोगावे लागले नसावे! कारण ते तात्काळ भोगून संपल्यासारखे नाही! या जन्मात वाईट कर्म करणारे काही अनैतिक लोक सुखात लोळत असल्याचे दिसतात, याचे कारण मागच्या जन्मात यांनी काही चांगली कर्मे केलेली असली पाहिजेत. त्याखेरीज त्यांच्या या जन्मातील सुखाची उपपत्ती जशी देता येत नाही, त्याचप्रमाणे या जन्मात भयंकर वाईट कर्मे करणाऱ्यांना एका जन्मात नव्हे पुढील अनेक जन्मात त्याची फळे निश्चितच भोगावी लागणार, असेच उत्तर त्यांच्या या जन्मातील भयंकर वाईट कर्माच्या फळाच्या उपपत्तीसाठी जावे लागते.( यांना ‘संचित कर्म’ ही संज्ञा दिलेली आहे.)