More Details

तीन वर्षांनी त्या बोलायला शिकल्या. १३ वर्षांच्या झाल्यावर त्यांनी शेजारच्या घरातील दाव सान मै ह्या बाईला सांगितले की त्या मागच्या जन्मी दोघे जपानी सैन्यातील भाऊ होते व ज्या घरात त्यांनी जन्म घेतला त्या घराच्या पश्चिमे कडील जागेत मेले होते.


बहुसंख्य प्रकरणात पुढील जन्म कुठे घ्यावयाचे हे ठरविण्याचे स्वातंत्र्य नसल्याचे दिसते. हे स्वातंत्र्य अर्थात् कर्माध्यक्ष ईश्वराचे आहे. जेथे हे स्वातंत्र्य एखाद्या व्यक्तीला असल्याचे दिसते ते सुध्दा तिच्यातील ईश्वराचेच ते स्वातंत्र्य असून ते अतींद्रिय शक्तीच्या स्वरूपात प्रकट झालेले असते, इतकेच. प्रत्येक व्यक्तीत अतीद्रिय (ईश्वरीय) शक्ती सुप्त स्वरुपात अस्तित्वात असते. काही व्यक्तीत ती प्रसंगोपात्त प्रकट होते, इतकेच. वरील व्यक्तीत ती प्रसंगोपात्त प्रकट झालेली दिसते आहे.