नमस्कार मित्रांनो,
ज्ञानवापी, ताजमहाल, मथुरा श्री कृष्ण मंदिर, कुतुबमिनार वगैरे सध्या चर्चेत आहेत.
संगीत ताजमहाल, व डॉ विद्याधर ओक यांनी नव्याने सादर केलेल्या पुराव्यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे.
पुना ओक यांनी आपल्या ताजमहालवरील पुस्तकात इलस्ट्रेटेड वीकली मधून प्रकाशित झालेले कृष्ण धवल चित्र सादर केले होते.
त्यात मूळ चित्र दि बोडलिन लायब्ररी ऑक्सफर्ड, मधील आहे असे म्हटले आहे. शिवाय ते १६२८ सालातील दिल्ली लालकिल्ल्यातील आहे असे वीकलीच्या मजकुरातून ध्वनित होते.
हे चित्र १६२८ मधील शहाजहांच्या राज्याभिषेकानिमित्तचे आहे. ही घटना दिल्लीतील लालकिल्ल्यात घडली असावी. त्यातील राजाची बैठक मागील चित्रे, दरवाज्याची दिशा पाहता दिल्लीतील लालकिल्ला असावा.
१. आता प्रश्न निर्माण होतो की ओकांच्या पुस्तकातील चित्रातील लालकिल्ला दिल्लीचा नसेल तर कुठला असावा?
चित्र तेच पण साल बदललेले. अली मर्दान खानला शहाजहां स्वागत करत आहे असे तेच चित्र १६४० सालचे आहे असे त्या खालील संदर्भ सांगतो. ते सांगताना हे चित्र जहांगीर पादशाह नाम्यातील असेल तर जहांगीर वारल्यावर त्याच्या नाम्यात हे चित्र
१६४० सालात काढले आहे हे विसंगत वाटते.