More Details

या सम हा - ग्रंथ परिचय


मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी लिहिलेल्या या ग्रंथात बाजीरावाच्या विशाल कर्तृत्वाचा एक कुशल सेनानी म्हणून परिचय करून दिला आहे.
३३५ पाने असलेल्या या ग्रंथावर संपादकीय हात फिरवण्याचे काम आनंद हर्डीकर यांनी केले आहे.
भूमिका स्पष्ट करताना मेजर जनरल शशिकांत पित्रे म्हणतात,... "बाजीराव एक सच्चा सोल्जर्स जनरल - बारगीरांचा सेनानी - होता… लष्करी सिद्धांतांच्या ऐरणीवर त्याला पारखले गेले नाही, लष्करी इतिहासात त्याच्या असामान्यतेची, युद्ध विजयी डावपेचांची दखल घेतली गेली नाही." या पार्श्वभूमीवर बाजीरावाच्या प्रत्येक लढाईचे लष्करी मोजमापातून विश्लेषण करण्याचे या पुस्तकाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
कोणत्याही परिसराचे विहंगम चित्र त्याच्या डोळ्यांसमोर उभे राही आणि त्याचा आपल्यासाठी कसा नेमका उपयोग करून घायचा याचे पूर्णावलोकन करण्याची त्याला असामान्य देणगी देवदत्त लाभली होती.