More Details

 पुनर्जन्म सिद्धांत जड बुद्धीला समजण्याजोग्या 'साचेबंद नियमांनी बांधला गेलेला नाही' या शब्दात 'गहना पुनर्जज्म- नो गति:' ही गोष्ट सांगितली आहे. 


सिवंती मागच्या जन्मात रॉबर्ट नावाचा ''पुरुष होती, "(रॉबर्ट या नावाने तो ओळखला जात होता व तेच तिने आपल्या मागच्या जन्मातील नाव सांगितले होते.) रॉबर्ट हा वडील ए. धर्मसेना व आई एम्. मेरी नोना यांच्या पोटी उनावतुना खेडयात १९४६ साली जन्मला. - त्याचे आईवडील अतिशय गरीब होते. त्यांच्या पाच पुत्रापैकी (तीन मुलगे व दोन मुली) रॉबर्ट सर्वात मोठा होता. त्याचे वडिलाशी प्रेमाचे संबंध नव्हते. आईशी मात्र प्रेमाचे संबंध होते. रॉबर्टचे ९ वीपर्यंत शिक्षण झाले होते व तो किरकोळ गवंडी काम करत होता. त्याला मुलीबद्दल कसलेच आकर्षण नव्हते, व तो अविवाहित होता, तथापि स्त्रैण नव्हता. नारळाच्या झाडावर चढणे, पोहणे, पत्ते खेळणे या सारख्या कामात तो पटाईत होता.