More Details

नाडी भविष्य वर्तवून बुद्धिवाद ही सर्वात... मोठी अंधश्रद्धा असल्याचे सिद्ध करणाऱ्या भारतीय सिद्ध योग्यांना हा ग्रंथ सादर समर्पण

 हेच दुसऱ्या शब्दात सांगायचे तर नाडीग्रंथ लिहून (नाडीभविष्य वर्तवून) भारतीय ऋषीमुनींनी अध्यात्माला वैज्ञानिक (किंवा विज्ञानाला आध्यात्मिक) बैठक दिली आहे आणि अशा रीतीने अध्यात्म व विज्ञान म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सिद्ध केले आहे. असे म्हणता येईल. अन्यथा भौतशास्त्रातील एखाद्या प्रयोगाने अध्यात्मशास्त्राचे (विश्व स्थलकालातीत तत्त्वावर अधिष्ठित असल्याचे म्हणणे सिद्ध झाले असते ना. अर्थात याचा अर्थ असा नाही की अध्यात्मशास्त्राचे सत्यत्व भौतशास्त्रीय प्रयोगावर त्या प्रयोगांनी त्याला मिळणाऱ्या समर्थनावर अवलंबून आहे. उलट भौतशास्त्रीय प्रयोगांचे सत्यत्वच से प्रयोग आध्यात्मिक सत्याला कितपत समर्थन देतात यावर अवलंबून आहे असे म्हणता येईल.

भौतिक शास्त्रातील सत्याची कसोटी अध्यात्म आहे, अध्यात्मशास्त्रातील सत्याची कसोटी भौतिकशास्य नाही, असा याचा अर्थ आहे.