More Details


या फौजदारी दाव्याचा निकाल २-४-१९९१ रोजी लागला. निकालात श्री. श्याम मानव, मुद्रक व प्रकाशक या तिघांनी डॉ. वर्तकांविषयी खोटा मजकूर प्रसिद्ध करून वर्तकांची बदनामी केल्याचा गुन्हा शाबीत झाला असल्याचे म्हटले असून त्याबद्दल या तिघांना कोर्टाने एक दिवस साधी कैद व शंभर रुपये दंड ठोठावला.


प्रथम श्रेणीचे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट श्री. एस. वाय. पाध्ये यांनी आपल्या निकालपत्रात म्हटले आहे की, श्री. मानव यांनी या प्रकरणी फार मोठा गंभीर गुन्हा केला असून त्यांना कायद्यानुसार फार मोठी शिक्षा व दंड करावयास पाहिजे. पण ते करीत असलेले सामाजिक कार्य लक्षात घेऊन त्यांना मी सौम्य शिक्षा व दंड करीत आहे. या पुढे असा गुन्हा न करण्याची ताकीद त्यांनी दिली आहे. पुस्तकातील वर्तकांविषयीचा सर्व मजकूर काढून टाकण्याचा हुकूमही त्यांनी केला आहे.