Alka Oak's E-book shoppy🚩
Search

Cart

More Details


माझे आपल्या समितीच्या उद्दिष्टाशी कसलेही भांडण नाही. कोणत्याही सुबुद्ध माणसाचे ते असण्याचे कारण नाही.

माझे म्हणणे इतकेच की हेरवाडमध्ये जे प्रकार घडले आहेत व अजूनही घडत आहेत त्या प्रकारांची वस्तुनिष्ठ तपासणी करून मगच त्याविषयी निष्कर्ष काढावेत. त्यांची अगोदरच अंधश्रद्धेत गणना करून त्यांची 'तपासणी' करू नये. तसे केले तर निष्कर्ष दूषित होतात. हे विज्ञानपद्धतीच्या विरुद्ध आहे. या दृष्टीने विचार केला तर मात्र आपल्या समितीचे घोषित धोरण व प्रत्यक्ष कृती यात विरोध आढळून येतो. आणि मग माझ्यासारख्या विज्ञानवृत्तीच्या माणसाला गप्प बसणे कठीण जाते.