More Details

इंग्रजीतील Rationalism या शब्दाचे मराठी भाषांतर बुध्दिवाद (किंवा बुद्धिप्रामाण्यवाद) असे रूढ झाले आहे. पण काही जण 'विवेकवाद' असेही त्याचे भाषांतर करतात. श्री. नी. र वऱ्हाडपांडे यांनी 'विवेकवाद' नावाचा एक ग्रंथ लिहिला असून त्याच्या पहिल्याच 'विवेकवाद म्हणजे काय?' या प्रकरणात आज बट्राँड रसेलसारखे तत्त्वज्ञ ज्या Rationalism चा पुरस्कार करतात, तो विवेकवाद प्रमाण म्हणून स्वीकारून त्याची पुढीलप्रमाणे व्याख्या केली आहे: “विज्ञानामध्ये सत्यशोधनासाठी जी पद्धती वापरण्यात येते त्या पद्धतीचा अवलंब केल्यावाचून जीवनाच्या कोणत्याही अंगाबद्दल सत्यज्ञान होऊ शकत नाही व त्या पद्धतीव्यतिरिक्त एखादी पद्धती वापरून झालेले ज्ञान सत्य आहे असे समजणे ही अंधश्रद्धा आहे असे मानणारा वाद म्हणजे विवेकवाद." (पृ.४)