'विवेकवाद' (२००१) नावाच्या आपल्या ग्रंथात श्री. नी. र. वऱ्हाडपांडे यांनी 'सत्याची कसोटी' व 'गूढवादाचा गौप्यस्फोट' या प्रकरणात प्रत्यक्ष व अनुमान या दोन प्रमाणांखेरीज 'गूढनुभूती' नावाचे सत्याचे तिसरे प्रमाण अस्तित्वात नाही, हे सिध्द करण्यासाठी व ईश्वर गूढनुभूतीने सिद्ध होत नाही, हे दाखविण्यासाठी गूढानुभूतीची स्वप्नाशी तुलना केली आहे.