खरे विज्ञान आणि खोटे विज्ञान
बुद्धिवादाचा विज्ञानाच्या दृष्टिकोणातून परामर्श
हा मथळा वाचून कोणालाही खोटे विज्ञान कसे असू शकेल, असा प्रश्न पडेल. जे सत्याच्या कसोटीला उतरते, ते विज्ञान होय. हे जर खरे असेल, तर खोटे विज्ञान असणेच शक्य नाही, असे म्हणता येते. पण विज्ञानाच्या नावाखाली असत्य प्रचार करण्याचा काहीजण प्रयत्न करतात, असा आरोप असून अशा प्रयत्नाला मिथ्याविज्ञान (Pseudo-Science) म्हणता येते, असे कांही लोकांचे प्रतिपादन आहे.