Alka Oak's E-book shoppy🚩
Search

Cart

प्रकरण १.  कडेगावची भानामती  ( E Book 155) - 1

प्रकरण १. कडेगावची भानामती ( E Book 155)

10₹20
50% OFF

Product Description

प्रकरण १ अंनिस वाल्यांचा खरा चेहरा.... गावातील मराठी शाळेतील इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या मुलींच्या डोळ्यातून आपोआप खड़े निघत असल्याचे व नेत्रतज्ज्ञ व इतर अधिकारी व्यक्तींनी हा प्रकार प्रत्यक्ष तेथे जाऊन पाहून खरा असल्याची खात्री करून घेतल्याचे व त्यांना हा प्रकार मती गुंग करणारा वाटला असल्याचे पुढे त्या बातमीत म्हटले होते. या संबंधीची खरी परिस्थिती समजावून घेण्यासाठी मी ही घटना घडून गेल्यानंतर, म्हणजे हा प्रकार पूर्ण थांबल्यानंतर व या प्रकाराने उठलेले वादळ शमल्यानंतर - १८ एप्रिल रोजी तेथे गेलो व संबंधितांच्या मुलाखती घेऊन सत्य परिस्थतीचा - शोध घेतला. मला आढळून आलेली पुढील माहिती संबंधितांच्या मुलाखतीवर आधारलेली आहे. ...Read More

More Details

 प्रकरण १ अंनिस वाल्यांचा खरा चेहरा....

गावातील मराठी शाळेतील इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या मुलींच्या डोळ्यातून आपोआप खड़े निघत असल्याचे व नेत्रतज्ज्ञ व इतर अधिकारी व्यक्तींनी हा प्रकार प्रत्यक्ष तेथे जाऊन पाहून खरा असल्याची खात्री करून घेतल्याचे व त्यांना हा प्रकार मती गुंग करणारा वाटला असल्याचे पुढे त्या बातमीत म्हटले होते. या संबंधीची खरी परिस्थिती समजावून घेण्यासाठी मी ही घटना घडून गेल्यानंतर, म्हणजे हा प्रकार पूर्ण थांबल्यानंतर व या प्रकाराने उठलेले वादळ शमल्यानंतर - १८ एप्रिल रोजी तेथे गेलो व संबंधितांच्या मुलाखती घेऊन सत्य परिस्थतीचा - शोध घेतला. मला आढळून आलेली पुढील माहिती संबंधितांच्या मुलाखतीवर आधारलेली आहे.

More in category

50% OFFImage ‘अंनिस’वाल्यांचा खरा चेहरा - प्रस्तावना (E Book 154)

‘अंनिस’वाल्यांचा खरा चेहरा - प्रस्तावना (E Book 154)

10₹20
ADD

विज्ञान आणि अंधश्रद्धानिर्मूलन अर्थात् या ग्रंथाची भूमिका शुध्द विज्ञानवादी आहे. (शुध्द विज्ञान म्हणजे कुठल्याही तत्त्वज्ञानाची बांधिलकी नसलेले विज्ञान.) शुध्द विज्ञानात 'दैवी' शक्तीला (Divine Power) किंवा परमेश्वराला (Personal God) अजिबात स्थान नाही. सर्व घटना प्राकृतिक आहेत असे शुध्द विज्ञान मानते व त्यांचे नैसर्गिक (natural) उपपत्ती शोधते. पण नैसर्गिक उपपत्ती हे दुधारी शस्त्र आहे. ते जसे अंधश्रध्देवर प्रहार करते, तसे जडवादी तत्त्वज्ञानावरही प्रहार करते ! आणि हीच जडवादी लोकांची सर्वात मोठी अडचण आहे. कारण सर्वच नैसर्गिक घटना जडवादी तत्त्वज्ञानात बसत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

50% OFFImage प्रकरण २. अनुराधाताईंचे विभूती अवतरण (E Book 156)

प्रकरण २. अनुराधाताईंचे विभूती अवतरण (E Book 156)

10₹20
ADD
50% OFFImage प्रकरण ३. ज्योतिषाला आव्हान - पलायन (E Book 157)

प्रकरण ३. ज्योतिषाला आव्हान - पलायन (E Book 157)

10₹20
ADD

'ज्योतिषशास्त्र खरे ठरले तर समिती बरखास्त करू' इति अंनिस - महाराष्ट्रातील अंनिसची स्थापना समाजात ज्ञानाचा वा विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी झालेली नसून विशिष्ट मत प्रचार व तद्द्वारा सवंग वृत्तपत्रीय प्रसिद्धी मिळविण्यासाठी झालेली असल्याचे एव्हाना जाणत्या लोकांना कळून चुकले आहे. एखाद्या राजकीय पक्षाने राजकीय स्वार्थासाठी 'गरिबी हटाव'ची घोषणा द्यावी, तसे या समितीने स्वतः च्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी व प्रसिद्धीसाठी 'अंधश्रद्धा निर्मूलना'ची घोषणा दिली आहे.

50% OFFImage प्रकरण ४. हेरवाडची भानामती  (E Book 158)

प्रकरण ४. हेरवाडची भानामती (E Book 158)

10₹20
ADD
50% OFFImage प्रकरण ५. अंनिसवाल्यांची फसवी भलावण (E Book 159)

प्रकरण ५. अंनिसवाल्यांची फसवी भलावण (E Book 159)

10₹20
ADD
50% OFFImage प्रकरण ६. अंनिकार्यकर्त्याला दंड (E Book 160)

प्रकरण ६. अंनिकार्यकर्त्याला दंड (E Book 160)

10₹20
ADD

या फौजदारी दाव्याचा निकाल २-४-१९९१ रोजी लागला. निकालात श्री. श्याम मानव, मुद्रक व प्रकाशक या तिघांनी डॉ. वर्तकांविषयी खोटा मजकूर प्रसिद्ध करून वर्तकांची बदनामी केल्याचा गुन्हा शाबीत झाला असल्याचे म्हटले असून त्याबद्दल या तिघांना कोर्टाने एक दिवस साधी कैद व शंभर रुपये दंड ठोठावला. प्रथम श्रेणीचे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट श्री. एस. वाय. पाध्ये यांनी आपल्या निकालपत्रात म्हटले आहे की, श्री. मानव यांनी या प्रकरणी फार मोठा गंभीर गुन्हा केला असून त्यांना कायद्यानुसार फार मोठी शिक्षा व दंड करावयास पाहिजे. पण ते करीत असलेले सामाजिक कार्य लक्षात घेऊन त्यांना मी सौम्य शिक्षा व दंड करीत आहे. या पुढे असा गुन्हा न करण्याची ताकीद त्यांनी दिली आहे. पुस्तकातील वर्तकांविषयीचा सर्व मजकूर काढून टाकण्याचा हुकूमही त्यांनी केला आहे.

50% OFFImage प्रकरण ७ ईश्वरवाद्यांची अंधश्रद्धा (E Book 161)

प्रकरण ७ ईश्वरवाद्यांची अंधश्रद्धा (E Book 161)

10₹20
ADD

संशयवादी बनून जीवन जगता येते काय ? या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रपंचात पडण्याचेच उदाहरण घेऊ. ज्या मुलीशी (किंवा मुलाशी) आपण लग्न करायचे ठरवतो, त्या मुलीमुळे (अगर मुलामुळे) आपण प्रपंचत सुखी होऊ काय, याविषयी आपण कधी पुरावे शोधतो काय? (पुरावे सापडतात काय हा प्रश्न बाजूला ठेवू.) उलट या बाबतीत पुरावे शोधणे किंवा संशयी वृत्तीने (धोका आहे असे समजून) लग्न करणे हाच निर्बुद्धपणा आहे असे आपण मानतो. कारण प्रेमात पडणे हे बुद्धिवादाचे (चिकित्सकपणाचे, संशय वृत्तीचे) काम नसून भावनेचे (आंधळेपणाचे) काम आहे असे आपण मानतो. (प्रेम आंधळे असते (किंवा आंधळे प्रेम खरे असते) हा आपला याविषयीचा सिद्धांत प्रसिद्धच आहे!) अशा रीतीने मनुष्याला ज्याच्याशिवाय प्रपंचात जगताच येत नाही, त्या प्रेमासारख्या महत्त्वाच्या विषयातच बुद्धिवाद (संशयवाद) निरुपयोगीच नव्हे, तर अडचणीचा ठरतो !

50% OFFImage प्रकरण ८ भानामती कर्नाटक सरकारचा शो  (E Book 162)

प्रकरण ८ भानामती कर्नाटक सरकारचा शो (E Book 162)

10₹20
ADD

प्रत्यक्षात कोणकोणते प्रकार घडले? आता या दोन जिल्ह्यातील अनेक गावात प्रत्यक्षात काय काय घडत होते, हे या समितीच्याच शब्दात पाहा - (१) स्त्रियांचे मंगळसूत्र, बांगड्या, जोडवी, घरातील पैसे कपडे अशा वस्तू एकदम अदृश्य होत. काही कालानंतर त्या पुन्हा परतही येत. (२) कपडे आपोआप जळत व फाडले जात. (३) कुंकू, हळद, लिंबे (काहींत खिळे घातलेले), बिब्बे आढळून येत. (४) घरावर दगड येऊन पडत. (५) झाडे वाळून जात. (६) हुमनाबाद या शहरात एक विलक्षण प्रकार घड़े तो असा एका घराचा दरवाजा जोरात ढकलला की शेजारच्या इतर दरवाजातून ढकलल्याचा आवाज निघे. या भानामतीचा अभ्यास करून समितीने जो निष्कर्ष काढला आहे, तो या समितीच्याच शब्दात पाहा - "या भानामतीचे बळी बनलेल्या बऱ्याच लोकांची सखोल तपासणी केल्यानंतर व या भानामतीच्या उपलब्ध घटनांची काळजीपूर्वक छाननी केल्यानंतर या शोधसमितीने असा एकमुखी आणि ठाम निष्कर्ष काढला आहे, की ही तथाकथित भानामती कोठल्याही अज्ञात शक्तीने घडून येत नाही." (हा निष्कर्ष समितीने अधोरेखित केला आहे.)

50% OFFImage प्रकरण ९. जागीरदारांवर अन्याय(E Book 163)

प्रकरण ९. जागीरदारांवर अन्याय(E Book 163)

10₹20
ADD

लोक आपले अनुभव गुप्त का ठेवतात? कोणतेही मत अनुभव आल्याशिवाय कोणी बनवत नाही. रूढ विज्ञानाच्या नियमात न बसणाऱ्या घटनांचा अनुभव आल्याशिवाय त्या घटना शक्य असल्याचे मत कोणी नोंदविणार नाही. निदान असे अनुभव आलेल्या जवळच्या व्यक्तींचा परिचय तरी त्यांना असला पाहिजे असे म्हणावे लागते. असे अनुभव आलेल्या व्यक्तींची संख्याही प्रचंड असल्याशिवाय त्यावर विश्वास असणाऱ्यांची संख्या इतकी मोठी असणार नाही, हे उघड आहे. असे अनुभव आलेले लोक इतक्या मोठ्या संख्येने असतील तर आपला अनुभव जाहीर करणाऱ्यांची संख्याही मोठी असावयास पाहिजे. पण ती तशी दिसत नाही. आपला अनुभव हे लोक गुप्त का ठेवतात ? असा यावर कोणी प्रश्न विचारील. याला उत्तर 'तशी संधी त्यांना मिळत नाही' हेच आहे. खासगीत ते आपला अनुभव सांगत असतातच. तसा प्रसंग उद्भवला तर ते आपला अनुभव जाहीरपणेही सांगायला मागेपुढे पाहत नाहीत असे आढळून आले आहे. याचे एक अलीकडे घडलेले प्रसिद्ध उदाहरण म्हणजे महाराष्ट्र विधानपरिषदेचे भूतपूर्व सभापती व प्रसिद्ध विचारवंत दिवंगत वि. स. पागे यांनी आपणाला आलेल्या एका चमत्काराच्या अनुभवाचे एका जाहीर सभेत केलेले कथन हे होय.

50% OFFImage प्र. १० नाडीभविष्य बुद्धिवाद्यांची हार(E Book 164)

प्र. १० नाडीभविष्य बुद्धिवाद्यांची हार(E Book 164)

10₹20
ADD

नाडी भविष्य वर्तवून बुद्धिवाद ही सर्वात... मोठी अंधश्रद्धा असल्याचे सिद्ध करणाऱ्या भारतीय सिद्ध योग्यांना हा ग्रंथ सादर समर्पण हेच दुसऱ्या शब्दात सांगायचे तर नाडीग्रंथ लिहून (नाडीभविष्य वर्तवून) भारतीय ऋषीमुनींनी अध्यात्माला वैज्ञानिक (किंवा विज्ञानाला आध्यात्मिक) बैठक दिली आहे आणि अशा रीतीने अध्यात्म व विज्ञान म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सिद्ध केले आहे. असे म्हणता येईल. भौतिक शास्त्रातील सत्याची कसोटी अध्यात्म आहे, अध्यात्मशास्त्रातील सत्याची कसोटी भौतिकशास्य नाही, असा याचा अर्थ आहे. पत्रात म्हटले आहे की "आपण म्हणता तो (नाडीग्रंथाचा ) अनुभव घेणे हे मारुतीच्या बेंबीत बोट घालण्यासारखे आहे असे मला वाटते.”

View all

Find us here


Alka Oak's E-book shoppy🚩

HomeAbout usकाय काय वाचाल Login

Shopdropdown button

१. मराठी ईपुस्तके : भक्ति मार्ग प्रदीप, गुरुचरित्र, श्रीपाद श्रीवल्लभ, लीला वैभव३. नाडी ग्रंथ मराठी ई पुस्तके, प्रेझेंटेशन५. ऑटोरायटिंग - स्व लेखन - गूढ विद्या OCCULT ARTS७. English - The Battle of Haldi Ghati and other Battles९. ताजमहाल वास्तूवर नवा प्रकाश११. पेशवेकालीन लढाया१३. My Days In The Air Force१५ विज्ञान आणि बुद्धिवाद प्राचार्य अद्वयानंद गळतगेंच्या पुस्तकातील प्रकरणे
२. मराठी : शशिकांत ओक यांचे सरमिसळ लेखन४. Naadi - English,हिन्दी, गुजराती, तमिळ नाड़ी ग्रंथ भविष्य ई पुस्तके६. बोध अंधश्रद्धेचा८. हिन्दी - हल्दीघाटी तथा अन्य लड़ाईयां१०. शिवाजी महाराजांच्या लढाया१२. मराठी : हवाईदलातील माझे दिवस - आठवणी आणि किस्से१४. प्राचार्य गळतगे - डार्विनवादी सिद्धांत आणि पुनर्जन्म संबंध लेखमाला१६. अंनिसवाल्यांचा खरा चेहरा

Visit our store

A4 /404 Ganga Hamlet Soc, Vimannagar, Pune. India. 411014., Pune , Maharashtra, 411014