More Details

विज्ञान आणि अंधश्रद्धानिर्मूलन अर्थात्


या ग्रंथाची भूमिका शुध्द विज्ञानवादी आहे. (शुध्द विज्ञान म्हणजे कुठल्याही तत्त्वज्ञानाची बांधिलकी नसलेले विज्ञान.) शुध्द विज्ञानात 'दैवी' शक्तीला (Divine Power) किंवा परमेश्वराला (Personal God) अजिबात स्थान नाही. 

सर्व घटना प्राकृतिक आहेत असे शुध्द विज्ञान मानते व त्यांचे नैसर्गिक (natural) उपपत्ती शोधते. पण नैसर्गिक उपपत्ती हे दुधारी शस्त्र आहे. 

ते जसे अंधश्रध्देवर प्रहार करते, तसे जडवादी तत्त्वज्ञानावरही प्रहार करते ! आणि हीच जडवादी लोकांची सर्वात मोठी अडचण आहे. कारण सर्वच नैसर्गिक घटना जडवादी तत्त्वज्ञानात बसत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.