More Details

जे मानवाच्या पाच ज्ञानेंद्रियांना जाणवते तेवढेच खरे आहे, अशा गृहीतकृत्यावर भौतविज्ञान (Physics) आधारलेले आहे. या उलट पाच ज्ञानेंद्रियांच्या पलीकडेही एक विश्व आहे, असे अतींद्रिय विज्ञान मानते. अशा रीतीने परस्परविरूद्ध गृहीतकृत्यांवर आधारलेली अभ्यासक्षेत्रे एकत्र येणे कसे शक्य आहे, असे वरील मथळा वाचून वाचकांना वाटले तर ते स्वाभाविक आहे. अतींद्रिय विश्व अस्तित्वात आहे, असे समजले तरी त्याचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास कसा शक्य आहे? असा प्रश्नही 'कांही जणांना पडणे शक्य आहे.