More Details

मनोज दाणींच्या पानिपतवरील चित्रमय ग्रंथातील काही पेंटींग्ज 1 जयाजीराव शिंदे यांच्यासह शिकारीला जाताना वाटेत एडविन लॉर्ड विक्स यांनी ते क्षण टिपले आहेत.

हातावर ससाणे धारी रक्षक इतका स्मार्ट दाखवलाय. मागील भागातील सजावट पाहता राजवाड्यातून ते बाहेर पडले असावेत.

 पायी चाललेल्या हुजर्‍याची एका हाताने घोड्यावर हाताची ठेवण जवळीक दाखवते. राजा शिकार करताना असे शिपाई देखील नेम धरून सावजाला टिपतात. पण नाव होते महाराजांच्या नेमबाजीचे! अर्थात हे जयाजीरावांच्या बाबत असेल असे नाही...

 हवेलीच्या गच्चीवरील कलाकुसर आणि पोपटांच्या बसण्याने नैसर्गिक उठाव आला आहे.

फुटपाथवरील सावलीत बसून येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकांसाठी (सध्याच्या पानठेल्यांप्रमाणे?)हुक्का पाणी करायची सोय आवडली. पाठ टेकून टेकून मळलेली भिंत हुबेहुब दिसते. रस्त्याच्या फुटपाथची रचना सिमेंटच्या चौकोनी ब्लॉक्स सारखी आहे!


 नाच गाणी करणाऱ्या मुली किंवा साहसी खेळ करून लोकरंजन करणारे कलाकार शक्यतो राजेसाहेबांच्या नजरेत दिसावे असे वाटून या मुलीला पुढे केले गेले असावे असा आभास वाटतो.