Alka Oak's E-book shoppy🚩
Search

Cart

More Details

कांचनबारीत शिवाजी महाराजांना कचाट्यात पकडायला दाऊद रसद, आणखी घोडदळ , पायदळ, शस्त्रास्त्रे यांची जमवाजमव करून दाऊदखान चांदवड किल्ल्याच्या भागातून तरातरा निघाला असावा. त्याने काही सैन्य कोलदेहेर कडील हमरस्त्यावरील खेळदरी गावापाशी नाके बंदीसाठी ठेवले असावे.


इखलासखानाने (तोफखान्यावरील हा निष्णात आणि हिकमती पठानखान पुर्वी आदिलशाहीतून मुघलांच्यापदरी नोकरीला आला होता.) तोफांच्या सरबत्तीचा प्रभाव कितपत पडला असेल? त्याला काही धोका तर झाला नसेल? असा विचार करून 

दाऊदखानाचे साधारण पाच हजाराच्या आसपास सैन्य इखलासखानाच्या मदतीला १४ किमी पार करून आले असावे. वाटेत त्याने खेळदरीत काही रसद व सैन्य मागे ठेवले असावे.


सिवा च्या सैन्याला हुसकावून लावून सुरतेच्या मालमत्तेला संपुर्ण मिळवायला आपले सध्याचे सैन्य अपुरे आहे. समजा ते तिथून सटकले तर त्यांना वणी ते दिंडोरीच्या रस्त्यावर अडवायला हवे वगैरे विचार करत तो १६ ऑक्टोबरच्या रात्री कांचनगडाच्या पायथ्याशी आला असावा.


सुरतेची लूट शेवटी स्वराज्यात आली का? बोटीने पाठवल्यागेलेल्या मालाचे काय झाले? कुंजिरगडावर लपवलेला माल नंतर कसा आणला गेला? कारंज्याहून ४००० बैलावर लादून आणलेली लूट राजगडावर कशी पोचली ? यावर प्रकाश...