More Details


कोण हा ब्लडी पिडली पायलट ऑफिसर.

हवाईदलातील माझे दिवस आठवणी आणि किस्से

...बुरी तरहसे फँसा तू रे’ असं मी मला म्हणत होतो. कुठून या चंदीगडला आलो व आल्या आल्या आता माझ्याविरुद्ध रिपोर्ट वगैरे ऐकून मला भिती वाटायला लागली...

...‘साहेब, अहो बँडवादनात माझी जिंदगी सरली. इथे फक्त परेडच्या सरावाला, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी अन पार्टीच्या वेळी ‘बँड इन अटेंडन्स’ असेल तर ‘डायनिंग इन नाईट’ च्या वेळी बोलावणे येते. 4-6 रमच्या बाटल्या आम्हाला देऊन “शाबाश”म्हणून बोळवण केली जाते...’

...मला त्या उद्गारांची आठवण कायम लक्षात राहावी अशी मनावर कोरली गेली. नंतरच्या सर्व्हीसमधे कधी कधी मला माझे अकौंट्स काम असेच बँड पथकासारखे, हवाई चढाईच्या कामापासून दूर, लांबून ‘छान, वा वा, शाबाश’ म्हटले की संपले अशा खाक्याशी जुळणारे वाटले!

...तो रापलेला चेहरा, "सर, सैन्याचा बँड सुमधुर गाण्यांसाठी नाही, रणांगणातील भीषण कत्तलीच्या, प्रचंड आवाजाच्या व धुळीच्या डोंबामधून आपली सेना लढतेय.