हवाईदलाचे काहींना जात्याच आकर्षण असते तर काहींच्या घराण्यात परंपरेने सैनिकी पेशा पुढील पिढीत चालवण्याची प्रथा असते. माझ्या बाबतीत यापैकी काहीच घ़डले नाही. ना मला बालपणापासून हवाईदलात भरती होऊन विमान चालवण्याचे वे़ड होते ना आमच्या ओकांच्या घराण्याची तशी शानदार परंपरा होती. नाही म्हणायला माझे चुलत काका स्व. पुरुषोत्तम नागेश ओक यांनी आजाद हिंद फौजेमधे भरती होऊन तारुण्यातील काही काळ मिलिटरीतील सेवेत काढला होता. तर एक दूरस्थ पुतण्या माझ्यानंतर हवाईदलात आला.
कॅडटशिपचे दिवस ...
७१-७२ – इंग्रजीची बोंब-
रंगनाथनची साथ, कुंडू कुंडू मूर्ती - कुकरी वाला हरालू, देवकर, बाकीचे साथी- अल्ब्युमिनची सफर दैय्या या मैं कहाँ आ फसी कारवाँचे गाणे
कमिशनिंग