रमणी गुरुजींचे जीवनाडीचे फलवाचन (E Book 108)
दि. १ फेब्रुवारी २०१६ रोजी पुण्यात झालेल्या रमणी गुरुजींच्या काकभुजंदर महर्षींच्या जीव नाडीचे वाचनात माझ्या (शशिकांत ओक) बाबत जे म्हटले गेले ते सादर…
नाडीशास्त्र म्हणजे काही विनोद नव्हे, हे तू सर्वप्रथमत: जाणून अस. हा विनोदाचा किंवा विरंगुळ्याचा विषय नक्कीच नव्हे. संपूर्ण नाडीशास्त्र हे त्या सिद्धपुरुषांनी, साधु-तपस्वी आणि योगीजनांनी त्यांच्या अपार परिश्रमांमधून, कठोर तपश्चर्यामधून आणि कष्टमय स्वसंयमनातून मिळविलेल्या अथांग त्रिकालज्ञानाचा एक भाग होय. लक्षांत घे, नाडीशास्त्राबाबत जे काही म्हणून आजमितीस ज्ञात आहे, ते त्या सहृदय आणि दयाळु महात्म्या महर्षीनी आपणांस वाटून दिलेला केवळ एक छोटासा भाग होय. बालका..! त्या ज्ञानसागराचा एक थेंबमात्रदेखील अमृतासमान आहे;
'चंद्र' तुझ्या नावाच्या प्रथम भागाचाही सूचक आहे. तर तुझ्या नांवाच्या दुसरा भाग हा खलाचा सूचक आहे. (तमिळ भाषेमध्ये 'कान्त 'क्कल् / हिंदी भाषेमध्ये सिल 'बट्टा मराठी भाषेमध्ये खलबत्त्यातील खल'). ह्या खलावर काहीही कितीही कुटले, तरी त्याच्यात काहीही शिरत नाही. तो स्वतः अपरिवर्तनीयच असतो, तोच गुण तुझ्यात अजूनदेखील आहे. तू तर कोणत्याही उपदेशाने अजिबात उपरत न होता, न बदलता.... स्वतःच ठरविलेल्या स्वतःच्याच एका विशिष्ट मार्गावर नेहमीच क्रमरत असतोस नां...असो...!"