More Details

सुजन हो, दुमदुमवा कानोकानी, ही ग्रामगीतेची वाणी ।

संतमहात्यांचे हद्गत। देवाचा शुभ सृष्टीसंकेत। विशद करावया सरळ भाषेत। सुखसंवाद आरंभिला।।

 येथे श्रोती विचारले । ग्रामगीते प्रति लिहिणे झाले। त्यात संत देव कासया घातले। स्तुतिस्तोत्रे गौरवूनि?।।

... काय देव म्हणता काम नोहे?। संता न भजता वाया जाय?। आशीर्वाद न घेता येतो क्षय। सत्कार्यासि?। कासयासि मध्यस्थता। उगीच देव धर्माची कथा?। करावी सर्व आपण गाथा। मारावी माथा देवाच्या?।।….


यावर ते म्हणतात –

देव म्हणजे अतिमानव। मानवचा आदर्श गौरव। त्याचे कार्य ध्यानी राहो। स्फूर्ति यावया पुढिलांसि।।

येथे मुख्य देवाचे व्याख्यान। नाही केले यथार्थ पूर्ण। देवासि पुरुषोत्तम समजून। वागा म्हणालो सर्वांना।।

मित्रहो! गाव व्हावे स्वयंपूर्ण। सर्व प्रकारे आदर्शवान। म्हणोनि घेतले आशीर्वचन पूर्वजांचे।। ग्रामातील सर्वजन। होवोत सर्वसुखी संपन्न। घेऊ नये कुणाचा प्राण। समाजस्थिती टिकावी।।

आम्ही सर्वचि संतुष्ट राहू। सर्वमिळोनि स्व खाऊ। राबू सर्व, सुखे सेवू जे जे असेल ते सगळे।।

... आमची संपत्ति नसे आमची। आमचि संतति नसे आमची। कर्तव्यशक्तिही नसे आमची। व्यक्तिशः उपभोगार्थ।।

हे सारे गावाचे धन। असो काया वाचा बुद्धि प्राण। ऐसे असे जयाचे धोरण। तो नास्तिकही प्रिय आम्हा।।

लोकांपुढे विशाल ज्ञान। ठेवाया अत्युच्च आदर्श कोण?। म्हणोनि देवाचे नामाभिमान। घेतले विशाल भावाने।।...