Alka Oak's E-book shoppy🚩
Search

Cart

More Details


गेल्या हजारो वर्षात ‘गरीब असणे’ हे नैसर्गिक असल्याने त्याला दुःखाचा दंश नसावा. कपडेलत्ते, दाग-दागदागिने, पायांना चपला, बूट यांचे दर्शन सामान्य जनतेला नसल्याने राजेराजवाडे, पैसेवाले सावकार, काही प्रमाणात वतनदार लोकांच्यापाशी ते सीमित असावेत. 

• बाकीच्यांना ‘एक अंगावर अन एक धुवून वाळत’ अशा वर्णनाप्रमाणे कमीतकमी खर्चाचे जीवनयापन करताना घरच्यांच्या, वरिष्ठांच्या दांडगाईच्या वर्तनामुळे दबून राहणे, मार खाणे, उलटून न बोलणे आदि गोष्टीना सामोरे जाताना काही विशेष आहे असे वाटत नसावे. 

• जातीपातींचा उल्लेख न करायची सध्याची दक्षता घेण्याची प्रथा, तेंव्हा पाळली जात नसावी. उलट जात कितीही कामाच्या दर्जाच्या दृष्टीने खालची किंवा किळसवाणी असली तरी त्याचा उल्लेख वारंवार करणे हे त्या समाजरचनेचे वैशिष्ठ्य असावे.